पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या जाहिराती अपलोड करण्यासाठी मुदतवाढ द्या! युवा विद्यार्थी असोसिएशनची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

 
 
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद खाजगी शैक्षणिक संस्था यांना रिक्त पदांचा तपशील जाहिरातीद्वारे देण्यासाठी पवित्र पोर्टलवर टॅब उपलब्ध करून देण्यात आला. याला जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटूनही अनेक संस्थांकडे बिंदू नामावली रोस्टर अपूर्ण असल्याकारणाने यांच्या जाहिराती अद्यापही पवित्र पोर्टल अपलोड न झाल्यामुळे व इतर कारणामुळे जाहिराती अपलोट करण्यासाठी मुदत वाढीची मागणी युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
 मागील ऑगस्ट व ऑक्टोबर महिन्यांमध्ये, राज्यातील पात्र युवक-युवतीच्या वतीने पुणे शिक्षण आयुक्त कार्यालय समोर दोन वेळा अन्नत्याग आंदोलन व नागपूर हिवाळी अधिवेशन पार्श्वभूमीवर आंदोलनानंतर शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यास प्रारंभ झाल. त्यानुसार राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद, खाजगी शैक्षणिक संस्थांना रिक्त पदांचा तपशील जाहिरातीसद्वारे देण्यासाठी पवित्र पोर्टलवर टॅब उपलब्ध करून देण्यात आला. यास जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटूनही अनेक संस्थांकडे बिंदू नामावली अद्यापही पूर्ण करण्यात आलेली नाही. यामध्ये नव्याने लागू आलेल्या आरक्षणाच्या कारणाने आवश्यक सुधारणा पारदर्शक सुनिश्चित करण्यासाठी अधिक वेळ लागतो आहे.
राज्यात २० फेब्रुवारी २०१५ पासून लागू आलेल्या आरक्षणाच्या अनुषंगाने विदर्भातील काही जिल्ह्यात ८० टक्के पेक्षा जास्त क्षेत्र पैसा अंतर्गत येत असल्याने संबंधित भागात बिंदू नामावली तयार करण्यासाठी अतिरिक्त वेळ लागतो आहे. तसेच पेसा क्षेत्रातील बिंदू नामावली बाबतचे सामान्य प्रशासन विभागाकडून बिंदू नामावली संबंधित करावयाच्या कार्यवाहीचे निर्देशपर मार्गदर्शन मिळण्यास विलंब होत आहे. शिक्षक भरती प्रक्रियेतील जाहिराती वेळेत अपलोड करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शिक्षण संस्थांनी आपल्या बिंदू नामावली तपासणे व अंतिम जाहिराती तयार करणे अत्यावश्यक असल्यामुळे या कामास विलंब होत आहे. काही खाजगी शिक्षण संस्थांना तांत्रिक समस्यांमुळे अडचणी येत आहेत. जाहिराती अपलोड करण्याची अंतिम तारीख १५ मार्च असल्यामुळे १५ मार्च, २०२५ रोजी जाहिराती अपलोड करण्याची प्रक्रिया बंद झाली. तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, अनेक खाजगी शिक्षण संस्था तसेच प्रलंबित शिक्षक पदाच्या रिक्त जागा पवित्र पोर्टलवर जाहिरातीच्या नसल्याने अगदी तुटपुंजी शिक्षक भरती होवून हजारो पदे रिक्त राहण्याची समस्या निर्माण होईल, पर्यायाने दुसया टप्प्याची शिक्षक पदभरतीचा उद्देश सफल होणार नाही. त्यामुळे पोर्टलवरील जाहिराती अपलोड करण्यासाठी कालावधी वाढवून देण्यात यावा. त्यामुळे सर्व संस्थांना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक वेळ मिळेल व पदभरती प्रक्रिया सुस्थितीत पार पाडता येईल, असे निवेदनाअंती नमूद केले आहे. निवेदन सादर करताना युवा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष तुषार देशमुख, विजय यादव, बाळासाहेब काशीद, सुनील खाडे, राकेश तुरणकर, संकेत मिर्झापूरे, ब्रम्हानंद मोरे, अर्जुन पवार, भगवान डोईफोडे, हेमांगी सावंत, अश्विनी राठोड, प्रणिता गाडेकर, मनीषा सोनवणे, रोहिणी काळे, प्रीती हत्ती, आनिता हाडवळे, आसावरी बाबर, सुमया नदाफ, जोवर खान आदींची उपस्थिती होती.