EXCLUSIVE जाता जाताही "बोक्या"चा मलईवर डल्ला! शेवटच्या दिवशीही हात मारून गेला...जिल्हा परिषदेत तुफान चर्चा!
या बोक्याच्या बऱ्याच कथा प्रसिद्ध आहे. ह्या बोक्याला घाटाखालील प्रसिद्ध "कचोरी" देखील खूप आवडायची. कचोरी खाण्यासाठी ह्या बोक्याचे बरेच "शासकीय" दौरे व्हायचे. कधीकधी ही "कचोरी" बुलडाणा मुख्यालयी मागवून अगदी दालनात देखील "कचोरी"वर ताव मारल्याचे किस्से आहेत.तर असो..खरेतर जाणाऱ्याबद्दल चांगल बोलायचं असतं हा संकेत असतो..मात्र या बोक्याबद्दल जिल्हा परिषद वर्तुळात कुणाला फारशी सहानुभूती नाही.
बोक्या तसा अनेकांची कामे मार्गे लावायचा,मात्र त्यासाठी लोण्याच्या गोळ्याचा हट्ट धरायचा..वर्तुळाला लागलेली ती सवय असल्याने बऱ्याचदा लोण्याचा गोळ्याचा हट्ट पुरवला जायचा..! तर असो..मुद्दा कालच्या शेवटच्या दिवसाचा..शेवटच्या दिवशी बोक्याने भरपेट मलाई खाल्ल्याचे सूत्रांनी सांगितले. मेहकर तालुक्यातून आणि घाटाखालाच्या एका तालुक्यातून मलाईचे दोन मोठे पार्सल बोक्याला प्राप्त झाले. आता ते पार्सल घेऊन बोक्या पुढील पत्त्याची वाट पाहत आहे...