EXCLUSIVE आयजींचा लंच ब्रेक! ७४ मिनिटे विश्व पानसरेंशी बोलले! ६ मिनिटे निलेश तांबेंशी बोलले! आत काय काय घडलं? वाचा...
May 30, 2025, 15:25 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्हा पोलिस दल आज राज्यभर चर्चेचा विषय ठरला. मागील आठवड्यात बदली झाल्यानंतर एसपी विश्व पानसरे यांनी बदलीला कॅट मध्ये आव्हान दिले होते. कॅट ने बदलीला स्थगिती दिली होती. दरम्यान आजारी रजेवर असलेले विश्व पानसरे आज सकाळीच एसपी कार्यालयात पोहचले होते, त्यांनी खुर्चीचा ताबा घेल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. तिकडे बुलडाणा जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारणारे निलेश तांबे देखील एसपी कार्यालयात पोहोचले होते. त्यांच्या खुर्चीवर आधीपासूनच पानसरे बसलेले असल्याने निलेश तांबे यांनी ॲडिशनल एसपी बी बी महामुनी यांच्या दालनातून कारभार सुरू केला. त्यामुळे खरे एसपी कोण? ऐकायचे कुणाचे असा संभ्रम जिल्हा पोलिस दलात निर्माण झाला..अखेर या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दुपारी १ वाजून ३१ मिनिटांनी आयजी रामनाथ पोफळे बुलढाण्यात धडकले...त्यानंतर त्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली..
१ वाजून ३१ मिनिटांनी एसपी कार्यालयात दाखल झालेल्या आयजी रामनाथ पोफळे यांनी आधी विश्व पानसरे यांच्याशी चर्चा केली, त्यानंतर त्या चर्चेत निलेश तांबे यांनी सहभागी करून घेण्यात आले..पहिल्या फेरीत ४४ मिनिटे विश्व पानसरे यांच्याशी चर्चा करणाऱ्या आयजींनी निलेश तांबे यांच्याशी अवघे ५ मिनिटे चर्चा केली..त्यानंतर दुसऱ्या फेरीत आयजी आणि विश्व पानसरे यांच्यात पुन्हा ३० मिनिटे चर्चा झाली....२ वाजून ५४ मिनिटांनी आयजी रामनाथ पोफळे यांनी लंच ब्रेक घेतला.. लंच ब्रेक नंतर पुन्हा बैठकीचे सत्र सुरू होण्याची शक्यता आहे..अद्याप एसपी कोण? यावर निर्णय झालेला नाही. सध्या निलेश तांबे यांच्याकडेच पदभार आहे..दोन्ही अधिकारी आपापल्या दालनात आहेत....