EXCLUSIVE दिलदार आमदार! अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ.संजय गायकवाड गेले धावून! मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २५ लाखांचा कर्तव्यनिधी.....
Updated: Sep 30, 2025, 12:03 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड त्यांच्या दिलदारपणा साठी प्रसिद्ध आहेत. संकटग्रस्तांसाठी धावून जाण्यात ते नेहमी पुढे असतात. सध्या संपूर्ण महाराष्ट्र व शेतकरी अतिवृष्टीने संकटात सापडले असताना आ.गायकवाड शेतकऱ्यांसाठी धावून गेले आहेत. प्रत्यक्ष बांधवांवर जाऊन आ.गायकवाड यांनी पाहणी केलीच..
मात्र केवळ कोरडी सांत्वना न देता आ.गायकवाड यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २५ लाखांचा कर्तव्यनिधी दिला आहे. आज,३० सप्टेंबरला एका पत्रकार परिषदेत आ.गायकवाड यांनी याबद्दलची घोषणा केली ...स्वतःचे दोन प्लॉट विकून आमदार गायकवाड यांनी ही रक्कम दिली आहे..
अस्मानी संकटामुळे संपूर्ण देश आणि देशातील शेतकरी हतबल आहे. घरादाराची राखरांगोळी झाली, जनावरे गेली..घरात पाणी घुसले..आपल्या डोळ्या समोर शेतकरी उद्धवस्त होत असताना समाजघटकांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे . डॉक्टर, वकील, प्राध्यापक, इंजिनिअर, विविध कंपन्या यांनी समोर आले पाहिजे असे आमदार गायकवाड यावेळी म्हणाले..शेतकरी टिकला पाहिजे, जगला पाहिजे यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे असेही आवाहन आ.गायकवाड यांनी केले. विशेष म्हणजे बुलडाणा शरीरातील सर्व्हे नंबर ४४ मधील स्वतःचे दोन प्लॉट विकून त्याची इसार पावती करून आ.गायकवाड यांनी २५ लाख रुपयांचा कर्तव्यनिधी दिला आहे.