EXCLUSIVE सापडला हो सापडला..! अखेर बुलढाण्यात संजय गायकवाडांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सापडला! घरातूनच दिला उमेदवार; पूजाताई गायकवाड यांनी भरला अर्ज...
Nov 17, 2025, 13:01 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा आज,१७ नोव्हेंबरला शेवटचा दिवस आहे. बुलढाणा शहरात शेवटच्या दिवसापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नव्हता, अखेर आता सर्वच पक्ष हळूहळू आपले पत्ते ओपन करत आहेत. "आम्ही योग्य उमेदवार शोधत आहोत, एखाद्या उच्चशिक्षित ब्राह्मण महिलेला उमेदवारी देण्याचा आमचा विचार सुरू आहे, असे म्हणणाऱ्या आ.गायकवाड यांना शोधा शोध करून उमेदवार सापडला आहे... आ. गायकवाड यांच्या धर्मपत्नी पूजाताई संजय गायकवाड यांनी थोड्या वेळापूर्वी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. स्वतः आ.गायकवाक यावेळी उपस्थित होते..
महाविकास आघाडी कडून दत्ता काका यांच्या धर्मपत्नी लक्ष्मी काकस यांना रिंगणात उतरवले जात आहे. तिसरीकडे भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे हे कोणता उमेदवार मैदानात उतरवतात हे महत्त्वाचे ठरेल. गेल्या कित्येक दिवसांपासून बुलढाणा नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण? हा चर्चेचा विषय ठरत होता. आ.संजय गायकवाड कुणाला उमेदवारी देतात याकडे अनेकांच्या नजरा लागून होत्या. आम्ही योग्य उमेदवार शोधत आहोत, आम्हाला अद्याप उमेदवार सापडलेला नाही असे विधान आ. गायकवाड यांनी केले होते..अखेर आ.गायकवाड यांच्यावर घरातूनच उमेदवार देण्याची वेळ आली आहे..
