ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा उकृष्ठ निकाल! उत्रादा येथील सलोनी नंदकिशोर इंगळे मुलींमधून प्रथम...
May 6, 2025, 08:35 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील धोत्राभणगोजी येथील ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा उकृष्ठ निकालाची परंपरा कायम राखत यावर्षीही घवघवीत यश मिळविले असून विज्ञान शाखेमधून उत्रादा येथील सलोनी नंदकिशारे इंगळे हिने ८९.१७ टक्के गुण प्राप्त करून मुलींमधून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
सदर महाविद्यालयाने विज्ञान व वाणिज्य शाखेतून घवघवीत यश मिळविले आहे. विज्ञान शाखेमधून महाविद्यालयातून पृथ्वीराज कदम ९०.६७ प्रथम, सलोनी नंदकिशारे इंगळे ८९.१७ व्दितीय, नेहा श्रीनाथ ८९ टक्के तृतीय, वेदांत माचमासे ८५.३० चतुर्थ, तृती कणसे ८५ पाचवी, भूषण गावंडे ८४.५० सहावा, प्रद्मुम्न शिंदे ८४ सातवा, तसेच वाणिज्य शाखेतून नंदा मिसाळ ७९.३३ प्रथम, रेखा कुटे ७८.६७ द्वितीय, पूनम ठेंग ७४.३१ तृतीय यांनी यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्ष इंदूताई शेळके, संस्था सचिव ज्ञानेश्वर शेळके, प्राचार्य विजय पवार आदींनी मार्गदर्शन केले.