डडंग डडंग डांगचिक डडंग डंग! रविकांत तूपकरांनी वाजवले डफडे! खूपगावात देवीच्या सोंगासमोर तुफान नाचले...
Mar 28, 2026, 18:20 IST
बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा)— बुलढाणा तालुक्यातील खुपगाव येथील पारंपरिक देवी यात्रेला यंदाही उत्साहात सुरुवात झाली आहे . शेकडो वर्षांची परंपरा जपणाऱ्या या यात्रेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित राहून भाविकांसोबत अनोख्या पद्धतीने सहभाग नोंदवला. देवीच्या सोंगासमोर
डफड्याच्या तालावर ठेका धरत त्यांनी तुफान माहोल तयार केला..
खुपगाव येथील देवीच्या सोंगाला या यात्रेत विशेष महत्त्व असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी भाविकांच्या आग्रहास्तव तुपकर यांनी पारंपरिक डफड्याच्या तालावर ठेका धरला. त्यांच्या तालबद्ध नृत्याने उपस्थित ग्रामस्थ आणि भाविक मंत्रमुग्ध झाले.
देवीच्या सोंगासमोर ‘पावली’ दाखवत तुपकर यांनी सादर केलेले पारंपरिक नृत्य हे ग्रामीण संस्कृतीशी असलेली त्यांची घट्ट नाळ अधोरेखित करणारे ठरले. एवढेच नव्हे तर त्यांनी स्वतः डफडे हातात घेत वाजवून वादकांना प्रोत्साहन दिले आणि यात्रेतील वातावरण अधिक उत्साही बनवले. सामाजिक व शेतकरी प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारे तुपकर यांचे हे पारंपरिक, उत्स्फूर्त आणि लोकाभिमुख रूप पाहून ग्रामस्थ भारावून गेले. त्यांच्या या सहभागामुळे यात्रेची शोभा अधिकच वाढली ...