

देऊळगाव घुबे गावात पिण्याच्या पाण्याची वणवण! महिना झाला, नळ नाही आले! संतप्त महिलांचा ग्रामपंचायत वर हंडा मोर्चा....
Apr 21, 2025, 10:04 IST
देऊळगाव घुबे (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव घुबे गावात महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. भर उन्हात १ –२ किलोमिटर अंतरावरून डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागत आहे.
Advt
ग्रामपंचायत ने पिण्याच्या पाण्याचे कोणतेही नियोजन केले नसल्याचा आरोप गावकरी करत आहेत. एक महिन्यापासून नळ आले नसल्याचे महिलांचे म्हणणे आहे. आम्ही करपट्टी, नळपट्टी भरतो मग आम्हाला पाणी का नाही असं सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. ग्रामपंचायतीच्या या नियोजनशून्य कारभारामुळेच पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या कारभाराला वैतागून आज,२१ एप्रिलला संतप्त महिलांनी ग्रामपंचायत वर हंडा मोर्चा काढला. पाणी समस्या मिटवली नाही तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.