तुला बाया दिसतं नाही का रे..! उघड्यावर अंघोळ करतो... देऊळघाट मध्ये महिलेने तरुणाला हटकले अन्.....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हा तरुण देऊळघाटचा आहे.. सय्यद शकील सय्यद जमील असे आरोपी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणाची तक्रार एका ३० वर्षीय महिलेने दिली आहे.. तक्रारीनुसार शकीला दारू पिण्याची सवय आहे.. तो घरात एकटाच राहतो, दारू पिऊन शिवीगाळ करतो आणि उघड्यावर आंघोळ करतो.

 घटनेच्या दिवशी दुपारी २ वाजता शकील दारू पिऊन घरी आला. त्याच्या घरासमोर उघड्यावर अंघोळ करू लागला..तेव्हा शेजारीन महिलेने त्याला हटकले.."रस्त्यावर बाया व लहान मुले असतात, रस्त्यावर आंघोळ करत जाऊ नको" असे म्हटल्यावर शकील संतापला. त्याने महिलेला पुन्हा शिवीगाळ केली..तू मला म्हणणारी कोण असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. घराजवळ पडलेले लाकडी राफ्टर उचलून महिलेच्या डाव्या हातावर मारले. रस्त्यावर पडलेल्या विटा महिलेच्या पाठीवर आणि छातीवर मारल्या.. मारहाणीमुळे महिला जखमी झाली असून महिलेने ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली..