ठाकरे ब्रॅंडमुळेच विजय मिळाला हे विसरू नका : जयश्रीताई शेळके ! आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर केली टिका...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे ब्रॅंड नसल्याचे म्हटले हाेते. त्यावर आता उद्धव सेनेच्या प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी उत्तर दिले आहे. ठाकरे ब्रॅंडमुळेच तुम्हालाच विजय मिळाला आहे हे विसरू नका अशी टिका शेळके यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर केली. 
जयश्रीताई शेळके म्हणाल्या की, बुलढाणा विधानसभा मतदार संघाची निवडणूक तुम्ही दाेन वेळा पराभूत झाले हाेते. अखेर ठाकरे ब्रॅंडमुळे तुम्ही बुलढाणा मतदार संघात विजय मिळवू शकले. हे तूम्ही विसरले असाल पण बुलढाणा मतदार संघातील मतदार विसरले नाहीत, असेही शेळके यांनी सांगितले.