जिल्हा शल्य चिकित्सकांच्या हस्ते उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सन्मान...!
Jan 28, 2025, 17:52 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांच्या हस्ते विविध विभागातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा समजून निष्ठेने काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने जिल्हा रुग्णालय आज सर्वोत्तम सेवा देत असल्याचा अभिप्राय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भुसारी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयाचा परिसर सुशोभित करण्यात आला होता. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. गेल्या वर्षभरात निष्ठेने आणि उत्तमरीत्या कर्तव्य निभावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. ओपीडी, जनरल वॉर्ड, आय.सी.यु या विभागासह जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वर्षभरातील कामगिरीचे मूल्यांकन करून त्यांची उत्कृष्ट कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली होती. यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील सहाय्यक अधीक्षक आर. एस. लाकडे, सहाय्यक अधीक्षक संजय धनवे, अभिलेखापाल प्रवर्तक लिहिते यांना जिल्हा शिंदे डॉ. भागवत भुसारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तसेच विविध विभागातील इतर कर्मचारी, परिचारिका आणि डॉक्टर यांनाही जिल्हा शल्य चिकित्सकांनी सन्मानित केले.