EXCLUSIVE अवैध धंद्याच्या विरोधात जिल्हा पोलिसांची धडक कारवाई! ६ दिवसांत जुगार आणि अवैध दारू विक्रेत्यांवर भक्कम कारवाया! २९७ केसेस मध्ये ३०० आरोपींवर गुन्हे; २८ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी अवैध धंद्यांना खपवून घेणार नसल्याचा स्पष्ट इशारा वेळोवेळी दिला आहे.कोणत्याही परिस्थिती अवैध धंदे करणाऱ्यांना सोडू नका अशा सक्त सूचनाच एसपी विश्व पानसरे यांनी जिल्ह्यातील सर्वच ठाणेदारांना ,विभाग प्रमुखांना दिल्या आहेत. गेल्या ६ दिवसांत जिल्हा पोलिस दलाने  तब्बल २९७ केसेस विविध पोलिस ठाण्यात नोंदवल्या आहेत..

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून प्रसिद्ध दिलेल्या पत्रकारानुसार २५ मार्च ते ३० मार्च दरम्यान जुगार, दारूबंदी आणि अवैध गुटखा अशा एकूण २९७ कारवाया करण्यात आला. या प्रकरणात ३०० आरोपींच्या विरोधात नियमानुसार गुन्हे दाखल केले असून तब्बल २८ हजार २६ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी, श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अशोक लांडे व जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनचे दाणेदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कार्यवाही केली.