जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्या शासकीय निवासस्थानी आढळला अतिविषारी घोणस! कर्मचाऱ्यांची धावपळ; सर्पमित्र रसाळ यांनी दाखवले प्रसंगावधान, सापाला पकडण्यात यश...

 

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांच्या शासकीय बंगल्याच्या परिसरात घोणस जातीचा साप निदर्शनास आला. घोणस हा अत्यंत विषारी सापांपैकी एक असल्याने कर्मचाऱ्यांनी कोणताही धोका न पत्करता सर्पमित्र रसाळ यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच रसाळ यांनी तत्परतेने घटनास्थळ गाठले आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने सापाला सुरक्षितरीत्या पकडले. या सर्पबचाव मोहिमेदरम्यान बंगल्यावरील कर्मचारी अब्दुल कबीर, कर्तव्यावर असलेले सुरक्षा रक्षक श्री. ऊबरहंडे तसेच पोलीस अंगरक्षक सोनुने उपस्थित होते. सर्पमित्र रसाळ यांच्या तत्परतेमुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. विशेष म्हणजे, जिल्ह्याच्या प्रशासकीय प्रमुखांच्या निवासस्थानीच अतिविषारी साप आढळल्याने हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.