उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २७ एप्रिलला बुलढाण्यात! आ. गायकवाड यांना निवडून देणाऱ्या मतदारांचे आभार मानण्यासाठी आभार दौरा....
Apr 23, 2025, 13:01 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २७ एप्रिलला बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. बुलढाणा शहरातील धाड नाका परिसरातील बी.के.लॉन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदारांनी भरघोस मतदान केले, या मतदारांचे आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदे बुलढाण्यात येत आहेत.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदारांनी भरघोस मतदान केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला देखील मोठा विजय संपादन करता आला. त्यामुळे मतदारांचे आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आभार दौरा काढला आहे. या दौऱ्याचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २७ एप्रिलला बुलढाण्यात येत आहेत. या दौऱ्या संदर्भात महत्त्वाची नियोजन बैठक आज,२३ एप्रिलला आमदार तथा जिल्हा संपर्कप्रमुख संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्या संदर्भातील नियोजनावर चर्चा करण्यात आली..