उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जिल्ह्यात! इसरूळ येथे सुरू असलेल्या संत चोखोबाराय पुण्यतिथी सोहळ्यास राहणार उपस्थित!

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याची उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे उद्या, १२ मे रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. चिखली तालुक्यातील इसरूळ येथे सुरू असलेल्या संत चोखोबाराय पुण्यतिथी सोहळ्यास ते भेट देणार आहे. ना.शिंदे यांच्या हस्ते आरती होणार आहे...

चिखली तालुक्यातील इसरूळ येथे हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या पुढाकारातून संत चोखोबाराय यांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. काल,१० मे पासून पुण्यतिथी सोहळ्याला सुरुवात झाली असून १८ मे पर्यंत हा सोहळा चालणार आहे. सकाळ आणि रात्रीच्या सत्रात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे हरीकिर्तन होणार आहे . विशेष म्हणजे यंदाच्या सोहळ्याचे आकर्षण शिवचरित्र कथा असून छत्रपतींचा धगधगता इतिहास अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष प. पू.स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या मुखातून ऐकायला मिळणार आहे. बुलढाणा जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच हरीकिर्तन सप्ताहात शिवचरित्र कथा ठेवण्यात आली आहे..