अंढेरा ठाणेदारपदी दिपक ढोमणे! रुपेश शक्करगेंची बदली; जानेफळ,डोणगाव, बीबी, साखरखेर्डाचेही ठाणेदार बदलले! एसपी निलेश तांबेकडून मोठे फेरबदल...
Updated: Jun 23, 2026, 16:52 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी जिल्हा पोलिस दलात मोठा फेरबदल केला आहे. जिल्ह्यातील ५१ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अनेक पोलिस ठाण्यांचे ठाणेदार बदलले आहेत, त्यात प्रामुख्याने अंढेरा, बीबी, जानेफळ, अमडापूर, जलंब ,धामणगाव बढे,धाड,बीबी या पोलिस ठाण्यांचा समावेश आहे.
अतिशय किचकट क्लिष्ट गुन्ह्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अंढेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार म्हणून यापुढे दिपक ढोमणे काम पाहणार आहेत. रुपेश शक्करगेंची सीसीटीएनएस कक्षात बदली करण्यात आली आहे. अमडापुर ठाणेदार म्हणून जयसिंग राजपूत, धामणगाव बढे येथे निखिल निर्मल ठाणेदार म्हणून जबाबदारी सांभाळतील. बीबी पोलिस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पाटील आता क्युआरटी पथकाचे प्रमुख म्हणून काम पाहतील,त्यांच्या जागेवर गजानन पिराजी सोनटक्के यांची बदली करण्यात आली आहे.
साखरखेर्डा ठाणेदारपदी युवराज रबडे, जलंब ठाणेदारपदी प्रवीण लिंगाडे, जानेफळ ठाणेदार पदी शरद माळी, डोणगाव ठाणेदार पदी गणेश इंगोले यांची बदली करण्यात आली आहे.