निधन वार्ता! कंबरखेड येथील वैजिनाथ धोंडगे सर यांचे निधन; उद्या रक्षाविसर्जन...
Mar 2, 2025, 12:21 IST
मेहकर: कंबरखेड ता.मेहकर येथील मुळ रहिवासी सेवानिवृत्त उपप्राचार्य कै.वैजिनाथ विठोबा धोंडगे सर यांचे दि.०१ मार्च २०२५ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम दि.०३ मार्च, सोमवार रोजी सकाळी ठीक ९.३० वाजता कंबरखेड येथे ठेवण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले धनंजय, प्रा.अमोल, डॉ.हर्षल यांचेसह तीन भाऊ, पुतणे, दोन बहिणी ,सुना, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.