BREAKING २७१२ वर दत्तात्रय लहाने २१ व्या फेरीत आऊट!

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  मोठा गाजावाजा करून मीच जिंकणार असा दावा करणारे दत्तात्रय लहाने अखेर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून आऊट झालेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे तिकीट त्यांना मिळाले होते..विजयासाठी त्यांनी कंबर कसून जोरदार प्रयत्न केले होते, मात्र त्यांना केवळ २७१२ मते मिळाली. बाद फेरीच्या २१ व्या फेरीत दत्तात्रय लहाने बाद झाले..आता किरण सरनाईक,आदिती पोहरे, श्रीकांत देशपांडे,सुरेश देवकर, दिलीप कडू असे ६ उमेदवार स्पर्धेत उरले आहेत...