बापरे! धक्कादायक; खडकपूर्णात हजारोंच्या संख्येत माशांचा मृत्यू; दुर्गंधीही सुटली! नेमके कारण काय?

 
 देऊळगाव राजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील खडकपूर्णा जलाशयात अचानक हजारो माशांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जलाशयात तथा काठावर मृत मासे दिसून येत असून, दुर्गंधीही सुटली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी याच जलाशयावर अवलंबून असलेल्या हजारो नागरिकांमध्ये भीती, निर्माण झाली आहे. अद्याप माशांच्या मृत्यूचे ठोस कारण स्पष्ट झालेले नाही.

देऊळगांव राजा खडकपूर्णा जलाशयात अचानक हजारो माशांचा मृत्यू झाला आहे. जलप्रदूषण, जलाशयात विषारी घटकांचा प्रवेश, बोटी नष्ट करताना वापरण्यात आलेल्या जिलेटिन स्फोटकांमुळे निर्माण होणारे रासायनिक दुष्परिणाम ही संभाव्य कारणे असू शकतात का? या घटनेत पर्यावरणीय समतोल बिघडण्याची आणि पाण्याची गुणवत्ता घसरल्यामुळे जनतेच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी व सामाजिक संघटनांनी तातडीने उपाययोजना करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.