जोडप्यांनो प्री-वेडिंग शूटचा इरादा असेल तर ही बातमी वाचाच..! आता लोणार मध्ये शूट करण्यासाठी लागणार "एवढे" रुपये..
Feb 28, 2025, 16:42 IST
लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून लोणार सरोवर जगविख्यात आहे.येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात.. खासकरून तरुणाईमध्ये फोटोशूट साठी लोणारला प्राधान्य दिले जाते..हल्ली लग्नाआधी प्री-वेडिंग शूटचा ट्रेंड आहे. लोणार सरोवर परिसरात जोडप्यांना प्री-वेडिंग करण्यासाठी आता ३५ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. पुरातत्व विभागाने यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. याआधी यासाठी कोणतंही शुक्ल आकारल्या जात नव्हते..
नवीन नियमानुसार लोणार परिसर व सरोवरातील ऐतिहासिक स्थळांवर प्री-वेडिंग करण्यासाठी ३५ हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. यासाठी इच्छुक जोडप्यांना किमान सात दिवस आधी बुकिंग करावे लागणार आहे. लोणार सरोवर हे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वारसा स्थळ असून येथे पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे जोडप्यांची येथे प्री-वेडिंग करण्यासाठी मोठी मागणी होती. मात्र पुरातत्वीय ठिकाणांचे संरक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी विभागाने आता ३५ हजार रुपये शुल्क निश्चित केले आहे. इच्छुक जोडप्यांना पुरातत्त्व विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून यासाठी नोंदणी करता येईल. शूटदरम्यान कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी जोडप्यांना घ्यावी लागणार आहे..