Corona Virus : आजही डबल सेंच्युरी!; बळींची संख्या दोनशेच्या घरात !!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) ः चाचण्यांबरोबरच रुग्ण संख्या वाढल्याने आज, 20 फेब्रुवारीला सलग दुसऱ्या दिवशीही रुग्ण संख्या दोनशेच्या पल्याड गेली! दिवसभरात जिल्ह्यात 215 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे बळींची संख्या दोनशेच्या घरात पोहोचली आहे.आरोग्य विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरटीपीसीआरसाठी 964, ट्रॉउंटसाठी 67 तर रॅपिड टेस्टकरिता 418 मिळून 1449 स्वॅब …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा ) ः चाचण्यांबरोबरच रुग्ण संख्या वाढल्याने आज, 20 फेब्रुवारीला सलग दुसऱ्या दिवशीही रुग्ण संख्या दोनशेच्या पल्याड गेली! दिवसभरात जिल्ह्यात 215 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे बळींची संख्या दोनशेच्या घरात पोहोचली आहे.
आरोग्य विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरटीपीसीआरसाठी 964, ट्रॉउंटसाठी 67 तर रॅपिड टेस्टकरिता 418 मिळून 1449 स्वॅब नमुने संकलित करण्यात आले होते. यापैकी 1040 जणांचे कोरोना विषयक अहवाल प्राप्त झाले. यातील 215 जण पॉझिटिव्ह आले आहेत. 19 फेब्रुवारीला बाधितांचा आकडा 271 इतका होता. मात्र पॉझिटिव्हीटीची टक्केवारी तुलनेने कमी म्हणजे 11.27 टक्के इतकी आहे. म्हणजे 100 पैकी सुमारे 11 जण पॉझिटिव्ह आले आहेत. दुसरीकडे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 186 पर्यंत गेली आहे. आजवरच्या बळींचे प्रमाण 1.17 टक्के इतके आहे, ही बाब दिलासादायक ठरावी, तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91. 48 टक्के इतके आहे.
दृष्टीक्षेपात कोविड

  • आजवरचे रुग्ण : 15, 845
  • सुटी झालेले : 14,496
  • मृत्यू संख्या : 186
  • सध्याची रुग्ण संख्या : 1163
  • नमुने संकलन : 1,40,509
  • अहवाल प्रलंबित : 1922