संवेदनशीलता आणि श्रद्धेचा संगम –परशुराम जयंती साधेपणात, पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व कार्यक्रम रद्द...

 
 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भगवान श्री परशुराम जयंतीचा पारंपरिक उत्साह यंदा पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. भगवान श्री परशुराम जयंती उत्सव समिती व सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने, नेहमीप्रमाणे भव्य शोभायात्रा, मोटरसायकल रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत होते, मात्र 28 निष्पाप भारतीयांच्या निर्घृण हत्येच्या घटनेने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.
स्थानीय राधा गोविंद मंगल कार्यालयात भगवान श्री परशुराम यांचे पूजन ब्राह्मण संघाचे अध्यक्ष ॲड. प्रदीप कवीमंडळ यांच्या हस्ते पार पडले. पूजनानंतर सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी या अमानुष घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवून "जशास तसे" उत्तर देण्याची भावना व्यक्त केली.
Buldana live banner
जागरूक रहा
या प्रसंगी उत्सव समितीचे पदाधिकारी, सकल ब्राह्मण समाजाचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या घटनेने वातावरण भावनिक झाले होते .