कौतुकास्पद कामगिरी! बुलढाणा जिल्ह्यात रोखले ११३ बालविवाह! महिला व बालविकास विभागाचे यश...

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलडाणा जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात ११३ बालविवाह रोखण्यात महिला व बाल विकास विभागाला यश मिळाले आहे. त्यामुळे अमरावती विभागातून बुलढाण्याला मिळाला बालस्नेही पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
 अजूनही समाजामध्ये बालविवाह होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत..ज्यामध्ये बुलढाणा महिला व बाल विकास विभागाला दोन वर्षात तब्बल ११३ बालविवाह रोखण्यात यश आले आहे..यामुळे अमरावती विभागातून बुलढाणा जिल्ह्याला बालस्नेही पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे..२०२३ मध्ये ५४ तर २०२४ मध्ये ५९ बालविवाह थांबवून कारवाई करण्यात आली आहे..मात्र बालविवाहाचा आलेख हा अजूनही वाढतानाच दिसत आहे..बालविवाह रोखन्यासंदर्भात प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे..तर बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास सजग नागरिकांनी १९९८ या टोल फ्री क्रमांक वर संपर्क करावा..माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवल्या जाईल असे आवाहन महिला व बाल विकास विभागाकडून करण्यात येत आहे..