बुलढाण्यात शहर पोलिसांचा रूट मार्च! सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिस अलर्ट मोडवर....
Jun 6, 2025, 18:52 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाण्यात सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांकडून मॉक ड्रिल आणि रूट मार्च करण्यात आला. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बुलढाणा पोलीस सज्ज झाले आहे.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये आगामी सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो असतो. या उत्सवात सहभागी होणाऱ्यांची संख्या लक्षात घेता पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रंगीत तालीम घेण्यात आली आहे. यामध्ये दंगा काबू पथकासह रॅपिड ॲक्शन फोर्सच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवल्यास काय खबरदारी घ्यायची याची रंगीत तालीम घेण्यात आली आहे. यावेळी बुलढाणा शहरात रूट मार्च सुद्धा काढण्यात आला आहे. या आगामी सण उत्सवात कुठल्याच प्रकारच्या अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले आहे