EXCLUSIVE बुलडाणा जिल्ह्यात बलात्काराच्या आकड्याची "सेंच्युरी"! चालू वर्षात १०३ आयाबहीणींची इज्जत लुटली! ३७८ छेडखानीच्या घटना; जिजाऊंच्या जिल्ह्यात नराधमांची हिंमत का वाढतेय?

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हा जिल्हा परस्त्रीला मातेसमान मानण्याची शिकवण देणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजाऊंचा..! छत्रपतींच्या स्वराज्यात परस्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कुणाची होत नव्हती, त्याला कारण होते छत्रपतींचे कठोर शासन..! मात्र आता काळ बदलला, कायदा बदलला..परिणामी गुन्ह्यांची संख्या वाढली, नराधमांची हिंमत वाढली..बुलडाणा जिल्ह्यात चालू वर्षात घडलेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हे ध्यानात येईल...यंदाचा वर्षांत बुलडाणा जिल्ह्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. जिल्ह्यात तब्बल १०३ बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा आकडा १३ टक्क्यांनी वाढला आहे..
बलात्काराच्या गुन्ह्यांचे वर्गीकरण केले असता बहुतांश गुन्हे लग्नाचे आमिष आणि खोट्या प्रेमप्रकरणातून झालेले दिसतात.चिंताजनक बाब ही की यातील १० टक्क्यांपेक्षा अधिक गुन्हे हे अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे आहेत. चालू वर्षांत १६९ अपहरणाचे गुन्हे घडले आहेत, त्यापैकी १४३ जणांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. जिल्ह्यात चालू वर्षांत ३७८ छेडखानीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेने हा आकडा १७ टक्क्यांनी वाढला आहे...
नराधमांची हिंमत का वाढतेय?
महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात सातत्याने वाढ होत आहे. सहज हातात असलेला अँड्रॉइड फोन, त्यावर सहज उपलब्ध होणारे पॉर्न, अश्लील कंटेंट यामुळे तरुण वाममार्गाला जात असल्याचे वास्तव आहे. बलात्कारांच्या गुन्ह्यांमध्ये अपवादाने फाशीसारखी कठोरात कठोर शिक्षा होते.काही प्रकरणे नंतर आपसात होतात. त्यामुळे आरोपींची हिंमत वाढत आहे...