जातीनिहाय जनगणना हा ऐतिहासिक निर्णय...! आ.. श्वेताताईंची प्रतिक्रिया! म्हणाल्या, देश आणि देशवासी यांच्या सर्वोच्च हितासाठी पंतप्रधानांचे ऐतिहासिक पाऊल..
May 3, 2025, 12:00 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचे अधोरेखित केले. त्यांच्या या निर्णयाचे सर्व देशभरातून स्वागत होत असून भारतीय जनता पार्टी चिखली शहर यांच्या वतीने देखील पंतप्रधानांनी घेतलेल्या या निर्णयाचे जल्लोष करून स्वागत करण्यात आले. "जातीनिहाय जनगणना हा एक ऐतिहासिक निर्णय असून, देश व देश वासी यांच्या सर्वोच्च हिताकरिता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी उचललेले हे ऐतिहासिक पाऊल आहे" अशी प्रतिक्रिया चिखलीच्या आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी दिली.
जनतेतील विविध जातींचे अचूक प्रमाण जाणून घेण्यासाठी आणि मागास, वंचित व अल्पसंख्यांक घटकांची खरी स्थिती समजून घेऊन जातनिहाय जनगणनेनुसार सामाजिक व आर्थिक योजनांची नीट आखणी करन्याकरिता तसेच
आरक्षण, शैक्षणिक सुविधा व नोकऱ्यांमध्ये न्याय्य वाटप होईल या व्यापक दृष्टिकोनातून जातनिहाय जनगणनेतून अचूक जातीय आकडेवारी मिळेल. १९३१ नंतर पहिल्यांदाच देशात OBC, SC, ST, इतर जातींचे खरे प्रमाण समोर येईल. यामुळे केंद्र व राज्य सरकारांना समाजरचनेचे वास्तविक चित्र समजेल. जवळ जवळ ६० ते ६५ वर्ष सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसला सर्व जाती धर्मामध्ये भांडणे लावून त्याचा फक्त राजकीय लाभ घेण्याची माहिती असल्याने त्यांनी मुद्दाम कधीच जातीय जनगणना होऊ दिली नाही.
"ज्याचं जितकं प्रमाण, त्याला
तितका हक्क" या तत्वानुसार जातनिहाय जनगणेत आरक्षण, विविध योजना, संसाधनांचे वाटप योग्य रितीने करता येते.त्यामुळे शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिलांचा विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी लक्ष्य केंद्रित योजना आखता येतात. अनेक छोट्या जातींचे आकडे नसल्याने त्या दुर्लक्षित राहतात. जातनिहाय जनगणनेमुळे त्यांचा उल्लेख, ओळख व राजकीय दबावगट निर्माण होईल.
सध्या केंद्राकडे OBC लोकसंख्येचा अधिकृत आकडा नाही. जातनिहाय जनगणना केल्यास ओबीसांचे प्रतिनिधित्व व योजनांतील वाटा निश्चित करता येईल. त्यामुळे संपूर्ण भारत वर्ष या जातनिहाय जनगणनेची स्वागत करेल त्यात कुठलाही संशय नाही असे आमदार सौ श्वेताताई महाले पाटील म्हणाल्या.
चिखली येथे आमदार सौ.श्वेताताई महाले यांच्या मार्गदर्शनात तसेच भाजपा शहराध्यक्ष सागर पुरोहित यांच्या नेतृत्वात छत्रपति शिवाजी महाराज चौक चिखली येथे जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष गणेशजी मांटे, सुरेशअप्पा खबुतरे, रामकृष्णदादा शेटे, डॉ. प्रतापसिंह राजपूत,पंडितदादा देशमुख,सुरेंद्रजी पांडे,रामदासभाऊ देव्हडे, शे.अनीस, गोविंद गिनोडे, हनुमंत भवर, अजय कोठारी, सुभाषाप्पा झगड़े,शाम वाक़दकर,हरिभाऊ परिहार, संजीव सदार, संतोष खबूतरे, गोविंद देव्हडे,विजय तिवारी,महेश लोणकर, गुरुदत्त सुसर, संजय अतार, नामु गुरुदासानी,विजय वाळेकर,गोपाल नकवाल,सिध्देश्वर ठेंग,अनंता सुरडकर, मनीष गोंधने, अक्षय भालेराव,शैलेश देशमुख, अनिकेत सावजी, नारायण भुजबल, संदीप लोखंडे,जावेद भाई, नज्जु भाई,सतीश भुजबल, सागर अग्रवाल,गणेश घुबे,विक्रांत महाजन,शुभम ठाकुर,हर्षल जाधव,विशाल पवार,हर्षल असोलकर तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.