सीसीटीएनएस मानांकनात बुलढाणा पोलीस दल राज्यात चौथ्या क्रमांकावर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगिरी

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सीसीटीएनएस (Crime and Criminal Tracking Network & Systems) या राष्ट्रीय प्रकल्पाच्या जून 2025 मधील मानांकनात बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

 

एनसीआरबी, नवी दिल्लीच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पाअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील एकूण ३४ पोलीस ठाण्यांचे संपूर्ण कामकाज संगणकीकृत करण्यात आले असून सर्व व्यवहार ऑनलाइन सुरू आहेत. जानेवारी २०२५ पासून ९ हजार १५५ प्रणालीतील फॉर्म फीडिंग आणि FIR Publish करण्यामध्ये बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने १० पैकी १० गुण मिळवले आहेत.


या उत्कृष्ट यशामध्ये अपर पोलीस अधीक्षक व सीसीटीएनएस नोडल अधिकारी अमोल गायकवाड, प्रणाली प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, तसेच पोलीस कर्मचारी सुनिल वाघमारे, किरण चिंचोले, दीपमाला पुरंदरे, कविता पाडळे, प्रतिभा इंगळे, नगमा शेख, संतोष कायंदे आणि दीपाली खर्चे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी या कामगिरीबद्दल सर्वांना अभिनंदन करून, आगामी मानांकनात बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवावा, असे निर्देश दिले आहेत.