

बुलडाणा शहर पोलिसांनी फुलवले "त्या" १६ जणांच्या चेहऱ्यावर हास्य! काहींनी तर आशा सोडली होती...
Updated: Mar 28, 2025, 11:35 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा शहरातील आठवडी बाजारात मागील काही दिवसात मोबाईल चोरीच्या अनेक घटना घडल्या होत्या. तशा तक्रारी शहर पोलीस ठाण्यात दाखल होत्या. बुलढाणा शहर पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने या मोबाईल मोबाईलचा छडा लावला आहे, आज,२८ मार्चला १६ जणांना त्यांचे त्यांचे मोबाईल सुपूर्द करण्यात आले..यावेळी हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेले दिसले...
बुलढाणा शहरातील आठवडी बाजारात भामट्या चोरट्यांनी अनेकांचे मोबाईल दामटले होते. बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तशा तक्रारी दाखल झाल्या होत्या, या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार बुलडाणा पोलिसांनी १६ मोबाईलचा यशस्वी तपास केला. आज ,१६ जणांना त्यांचे मोबाईल ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. या मोबाईलचा तपास ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात सपोनि जयसिंग राजपूत, पीएसआय मोरे, युवराज शिंदे, विनोद बोरे, संदीप कायंदे, कौतिक बोर्डे , मनोज सोनूने यांनी केली..
२०२३ मध्ये हरवला होता मोबाईल; आशा सोडली होती...
दरम्यान यावेळी मुठ्ठे ले आऊट मध्ये राहणाऱ्या संतोष सनई यांनाही त्यांचा मोबाईल सुपूर्द करण्यात आला. खाजगी नोकरी करणाऱ्या संतोष सनई यांचा मे २०२३ मध्ये बुलढाणा शहरातील बस स्टॅन्ड वरून ओपो कंपनीचा मोबाईल चोरीला गेला होता. जवळपास दोन वर्ष उलटल्याने त्यांनी मोबाईल सापडेल अशी आशाही सोडली होती. त्यामुळे त्यांनी दुसरा मोबाईल खरेदी केला.मात्र आज,२८ मार्चच्या सकाळी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यातून फोन सापडल्याचा फोन आला तेव्हा सुखद धक्का बसल्याचे सनई म्हणाले..