

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर बौद्ध समाजबांधव धडकले! वाचा कारण काय...
Mar 15, 2025, 15:42 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाण्यात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्यावतीने महाबोधी महाविहार कायदा करण्यात यावा यासाठी आज बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
बौद्ध समाज बांधवांचे पवित्र स्थळ महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बिहार येथे चालू आहे. या मागणीला पाठींबा देण्यासाठी संबंध देश भरामध्ये धरणे आंदोलन करण्यात येत आहे.. या आंदोलनाच्या समर्थनात आज बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने मलकापूर रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळून मोर्चा काढण्यात आला आहे. बौद्धगया येथील महाबोधि महाविहार 1949 चा व्यवस्थापन कायदा रद्द करण्यात यावा. महाबोधी महाविहाराचे नियंत्रण संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे. बुलढाणा जिल्ह्यातील भोन येथील प्राचीन बौद्ध स्तूपाचे जतन करून जागतिक संशोधन केंद्र व पर्यटन स्थळ करावे या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बौद्ध समाज बांधव उपस्थित राहून घोषणाबाजी केली आहे..