BREAKING एसपी ऑफिसमध्ये तणाव! आत काय घडतंय? जिल्ह्याचे एसपी कोण? पानसरे की तांबे.... दोघेही एसपी ऑफिसमध्ये... पानसरेंनी खुर्चीचा ताबा घेतल्याची चर्चा
मागील आठवड्यात एसपी विश्व पानसरे यांची बदली झाली होती. त्यांच्या जागी निलेश तांबे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तांबे यांनी नियुक्ती झाल्याच्या दिवशीच पदभार स्वीकारला होता.. आठ महिन्यात बदली झाल्याने अन्याय झाल्याची भावना असल्याने एसपी विश्व पानसरे यांनी बदलीला कॅटमध्ये आव्हान दिले होते. त्यानंतर या बदलीला कॅटने स्थगिती दिली होती.. दुसरीकडे निलेश तांबे आपला कारभार सांभाळत होते. काल त्यांनी काही पोलिसांच्या बदल्या देखील केल्या.. आजारी रजेवर असलेले विश्व पानसरे यांची भूमिका काय असेल याची चर्चा सुरू होती. अशातच आज सकाळीच विश्व पानसरे एस पी कार्यालयात दाखल झाले.. त्यांनी खुर्चीचा ताबा घेतल्याची चर्चा असून, निलेश तांबे देखील एसपी कार्यालयात पोहोचले आहेत... सध्या तणावपूर्ण वातावरण आहे... जिल्ह्याचे एसपी नेमके कोण असा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे?