Breaking News! हरणी, ज्ञानगंगा नदीवरील पूल क्षतीग्रस्त!!; वाहतूक थांबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली- माटरगाव दरम्यानच्या हरणी व ज्ञानगंगा नदीवरील पूल क्षतीग्रस्त झाल्याने या पुलावरून होणारी वाहतूक तात्काळ थांबविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आज, 30 मे रोजी यासंदर्भातील आदेश जारी केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता (खामगाव) यांनी मागील 27 मे रोजीच्या पत्राद्वारे जिह्वाधिकारी यांना …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चिखली- माटरगाव दरम्यानच्या हरणी व ज्ञानगंगा नदीवरील पूल क्षतीग्रस्त झाल्याने या पुलावरून होणारी वाहतूक तात्काळ थांबविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आज, 30 मे रोजी यासंदर्भातील आदेश जारी केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता (खामगाव) यांनी मागील 27 मे रोजीच्या पत्राद्वारे जिह्वाधिकारी यांना माहिती सादर केली होती. त्यानुसार वर्णा, सारोळा, श्रीधरनगर, माटरगाव हरणी उंद्री या राज्य मार्गाला जोडणाऱ्या मार्गावर असलेल्या ज्ञानगंगा नदीवरील 40 मीटर पुलाचे पायर (pire) नादुरुस्त झाल्याने पूल क्षतीग्रस्त झाला आहे. तसेच हरणी नदीवरील 34 मीटर लांबीच्या पुलाचे पायर सुद्धा क्षतीग्रस्त झाले आहेत. परिणामी पुलाला वाहतुकीमुळे धोका असून मोठ्या अपघाताची शक्यता आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले. याशिवाय पत्रात पर्यायी मार्ग सुचविण्यात आले आहेत.

दुरुस्ती होईपर्यंत वाहतूक बंदच
दरम्यान या आदेशात माटरगाव व चिखलीकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. चिखलीकडे जाण्यासाठी रोहना फाटा, वर्णा, कोंटी, हिवरखेड, गणेशपूर, उंद्री असा पर्यायी मार्ग आहे. चिखलीवरून माटरगावकडे जाण्यासाठी उंद्री, हिवरखेड फाटा, कोंटी, वर्ण, सारोळा, श्रीधरनगर, माटरगाव असा पर्यायी मार्ग आहे. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येत आहे.