Breaking आमदार धीरज लिंगाडेंना शिंदेसेनेत जाण्यासाठी २० कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या विधानावर आ.लिंगाडे म्हणाले, ऑफर मिळाली......

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यात सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा आहे. उबाठा शिवसेनेच्या ६ खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. अशातच आता उबाठा नेते खा.संजय राऊत यांच्या एका दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांना शिंदेंच्या शिवसेनेत जाण्यासाठी २० कोटींची ऑफर गेल्याचा दावा खा.संजय राऊत यांनी केला आहे.या दाव्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेने आणखी काही नवी मोहीम हाती घेतली आहे की काय अशी चर्चा सुरू आहे..दरम्यान आ.धीरज लिंगाडें यांनी खा.संजय राऊत यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

 

आज सकाळी पत्रकारांशी बोलताना खा.संजय राऊत यांनी आ. लिंगाडे यांना २० कोटींची ऑफर गेल्याचा दावा केला होता. यावर बोलतांना आ.लिंगाडे म्हणाले की, संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यामुळे मलाही आश्चर्य वाटले आहे. खा.राऊत आमच्या महाविकास आघाडीचे नेते आहेत, मात्र त्यांनी केलेलं विधान अतिशय चुकीचं आहे. मला कोणतीही ऑफर आलेली नाही. जरी अशी कोणतीही ऑफर आली तरी ती ऑफर मी धुडकावून लावेल. पैशांसाठी मी राजकारणात आलेलो नाही. मी राऊत साहेबांना भेटून याबद्दल नक्की विचारणा करेल असे आ.लिंगाडे म्हणाले.