BREAKING आयजी रामनाथ पोफळे बुलढाण्यात धडकले! एसपी कोण? तोडगा निघणार ....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सकाळपासून बुलढाणा जिल्हा पोलीस दलात नाट्यमय घडामोडी घडत आहेत... आज सकाळीच जुने एसपी विश्व पानसरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील दालनात येऊन खुर्चीचा ताबा घेतला...दुसरीकडे नवी एसपी निलेश तांबे आतापर्यंत ॲडिशनल एसपी  यांच्या दालनात बसलेले होते... विश्व पानसरे यांची गेल्या आठवड्यात बदली झाली होती, त्या विरोधात ते कॅटमध्ये गेले होते... त्या बदलीला स्थगिती आली होती..दरम्यान आज आजारी रजेवरून विश्व पानसरे एस पी कार्यालयात आले.. मात्र अद्यापही चार्ज निलेश तांबे यांच्याकडेच आहे...त्यामुळे एसपी कोण ? असा संभ्रम सध्या निर्माण झालेला आहे..दरम्यान आत्ताच अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोफळे एसपी कार्यालयात पोहोचले आहेत..सध्या ते विश्व पानसरे यांच्याशी चर्चा करीत आहे...