BREAKING बुलढाण्यात अग्नितांडव! सर्क्युलर रोडवरील "होम फायनान्स"च्या ऑफिसला भीषण आग.....
May 9, 2025, 22:18 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाण्यात थोड्या वेळापूर्वी भीषण अग्नितांडव सुरू झाले. सर्कुलर रोडवरील मोतीलाल ओसवाल होम फायनान्स कंपनीच्या ऑफिसला याला थोड्या वेळापूर्वी भीषण आग लागली. या आगीत कार्यालयातील कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक साहित्य ,फर्निचर जळून खाक झाल्याचा अंदाज आहे.
९ वाजून ४० मिनिटांनी ही आग लागली. बुलढाणा नगरपालिका प्रशासनाचे अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.