BREAKING..! चिखलीत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे किडनॅपिंग? खडकपुऱ्यातील मुन्नाशहावर संशय! मध्यरात्री गुन्हा दाखल...

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) चिखली शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे किडनॅपिंग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. चिखली शहरातील खडकपुरा भागात राहणाऱ्या मुन्नाशहा मुबारकशहा नामक तरुणावर संशय आहे.. संशयित म्हणून त्याच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
 प्राप्त माहितीनुसार पिडीत मुलगी ही परराज्यातील आहे. ती तिच्या आत्याच्या घरी चिखलीत राहण्यासाठी आलेली होती. तिच्या आत्याचा चिखलीत पाणीपुरीचा व्यवसाय आहे.
 गेल्या ४ महिन्यांपासून मुलगी आत्याकडे राहत होती. काल, सायंकाळी गणपती भंडारा असल्याने मुलीची आत्या आणि सर्व नातेवाईक भंडाऱ्याच्या कार्यक्रमात व्यस्त होते. मुलगी राहत असलेल्या विवेकानंद नगर भागात एका घराचे बांधकाम सुरू आहे, त्या बांधकामावर मुन्नाशहा मुबारकशहा हा मजुरी कामासाठी येत होता. काल सायंकाळच्या सुमारास मुलगी मुन्नाशहा सोबत बोलत असल्याचे काहींनी पाहिले होते.
 अन् भुर्र........
 
दरम्यान काही वेळानंतर नातेवाईकांना मुलगी दिसली नाही. तिची शोधाशोध सुरू झाली मात्र ती मिळून आली नाही. मुलीची आत्या तिला शोधण्यासाठी चिखली रोडवरील पानगोळे हॉस्पिटलजवळ गेली तेव्हा मुलगी एका तरुणाच्या मोटारसायकल वर बसलेली असल्याचे मुलीच्या आत्याला दिसले. मुलीच्या आत्याने मुलीला आवाज देताच गाडीवाल्या तरुणाने गाडीला किक मारून गाडी दामटली. मुलीच्या नातेवाईकांनी संशयावरून मुन्नाशहा याच्या घरी जाऊन बघितले असता तो घरी नव्हता, त्यामुळे त्याच्यावरच संशय असल्याचे म्हणत त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे....