BREAKIKG अर्धविराम की पूर्णविराम? बाय पानसरे साहेब! निलेश ताबेंनी खुर्ची मिळवली; पण...... प्रश्न कायम...
Updated: May 30, 2025, 17:55 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज सकाळपासून जिल्हा पोलिस दलात सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींवर अखेर अर्धविराम लागला आहे. एसपी विश्व पानसरे यांनी बदलीच्या आदेशाला आव्हान देत स्थगिती मिळवली होती, त्यावर पुढील सुनावणी ९ जून रोजी होणार आहे. पानसरे यांच्या बदलीच्या आव्हानाला कॅट मध्ये सुनावणी होऊन स्थगिती मिळवण्याआधीच आदल्या रात्री निलेश तांबे यांनी पदभार घेतला होता..दरम्यान आता हाती आलेल्या माहितीनुसार ९ जून रोजी होणाऱ्या पुढील सुनावणी पर्यंत तरी एसपी म्हणून निलेश तांबे हेच एसपी म्हणून कारभार सांभाळणार आहेत..सकाळी विश्व पानसरे यांनी निलेश तांबे यांच्या खुर्चीचा ताबा घेतला होता, दुपारपर्यंत एसपी पानसरे त्याच दालनात बसून होते..तोपर्यंत निलेश तांबे हे ॲडिशनल एसपी यांच्या दालनात बसून काम सांभाळत होते...दुपारी आयजी रामनाथ पोफळे यांनी दोघांशी चर्चा केली..त्यानंतर आयजी जेवणासाठी शासकीय विश्रामगृहावर गेले..तिथेच पुन्हा त्यांनी निलेश तांबे यांना बोलावून घेत त्यांच्याशी चर्चा केली...इकडे दुपारी विश्व पानसरे हे देखील घराकडे निघून गेले. दरम्यान सायंकाळी आयजी गेल्यानंतर निलेश तांबे शासकीय विश्रामगृहावरून एस पी ऑफीस मध्ये पोहोचले.. विश्व पानसरे निघून गेल्याने त्यांचे मूळचे दालन रिकामे झाले होते..त्यामुळे निलेश तांबे यांनी पुन्हा आपल्या खुर्चीवर बसून कारभार पाहिला सुरुवात केली आहे...

एसपी कोण? याचा निर्णय अद्याप झाला नसल्याची माहिती आहे. मात्र ज्या पद्धतीने तांबे यांनी कारभाराला सुरुवात केली आहे, त्यांच्या देहबोली वरून सध्यातरी तेच "बॉस" असल्याचे दिसत आहे. दुपारी ॲडिशनल एस पी कार्यालयात हलवलेल्या फायली पुन्हा एकदा निलेश तांबे यांच्या टेबलवर पोहचल्या आहेत... दरम्यान या संदर्भात आयजी रामनाथ पोफळे यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला, हा पोलिस खात्याचा अंतर्गत विषय आहे एवढे सांगून ते निघून गेले....