शनिवारी अंचरवाडीत भाजपचा संकल्प मेळावा! "संकल्प से सिद्धी" अभियाना अंतर्गत विशेष कार्यक्रम! आणीबाणीत तुरूंगवास भोगलेल्या दाम्पत्यांचा होणार कृतज्ञता गौरव!
कारसेवकांचाही होणार सन्मान! आ. श्वेताताई महाले, भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांची राहणार उपस्थिती....
Updated: Jun 12, 2025, 09:45 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे शनिवार १४ मे रोजी सायंकाळी विशेष कार्यक्रम होणार आहे. भाजपच्या "संकल्प से सिद्धी" अभियानांतर्गत विकसित भारत संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीशजी गुप्त, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, संकल्प से सिद्धी अभियानाचे जिल्हा संयोजक चंद्रकांत बर्दे
या कार्यक्रमाला विशेष उपस्थित राहणार आहेत..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित ११ वर्षांतील कार्यकाळाचा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने संकल्प से सिद्धी तक अभियाना भाजपच्या वतीने राबविण्यात येत आहे. याच अभियानाचा भाग म्हणून अंचरवाडी येथे विकसित भारत संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आणीबाणीत तुरूंगवास भोगलेल्या दाम्पत्यांचा कृतज्ञता गौरव करण्यात येणार असून राममंदिर आंदोलनात कारसेवा करणाऱ्यांच्या देखील सन्मान करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला भाजपच्या शक्ती केंद्रप्रमुखांनी, बूथप्रमुखांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन साखरखेर्डा मंडळ अध्यक्ष शिवाजी वाघ यांनी केले आहे..