BIG NEWS रणरणत्या उन्हात चिखलीच्या खामगाव चौकात प्रकाश आंबी कडून "शिवाजी कोण होता" पुस्तकाचे जाहीर वाचन...पोलिसांनी बुलढाण्याला जाऊ दिलेच नाही..

चिखलीतही वाचनात छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख..वाचा सकाळपासून आतापर्यंत काय काय झाले..!
 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्याचे वातावरण आज चांगलेच टाईट झाले आहे. "शिवाजी कोण होता?" या पुस्तकाच्या वरून निर्माण झालेला वाद शिगेला पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात आमदार गायकवाडांनी पुस्तकाच्या प्रकाशकाला शिव्या दिल्या होत्या, त्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती.. त्यानंतर पुरोगामी चळवळ व कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आमदार गायकवाड यांच्या विरोधात राज्यभरात निदर्शने करण्यात आली होती. आज बुलढाण्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, या मोर्चासाठी प्रकाशक प्रकाश आंबी बुलढाण्यात येणार होते. मात्र त्याआधीच चिखली पोलिसांनी आंबी यांना अडवले.. दुसरीकडे आंबी यांची वाट पाहत बुलढाण्यात थांबलेल्या आंदोलकांना पोलिसांनी अक्षरशः  फरपटत नेले.. बुलढाणा आमदार गायकवाड यांचे समर्थक वाटले होते, एका बाजूला भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते संजय गायकवाड मुर्दाबादच्या घोषणा देत होते, दुसरीकडे आमदार गायकवाड यांचे समर्थक गायकवाड यांच्या समर्थनाच्या घोषणा देत होते. दरम्यान बुलढाण्यातील आंदोलन चिरडल्यानंतर पोलिसांनी चिखलीतही आंदोलन दडपले.. बुलढाण्यात जाऊ देण्याचा आग्रह धरणाऱ्या प्रकाश आंबी यांना बुलढाण्यात जाऊ देण्यात आले नाही.. खामगाव चौफुलीवर हॉटेल अमृततुल्य मध्ये त्यांना काही काळ अडवण्यात आले होते.. तिथे अप्पर पोलीस अधीक्षक श्री. गायकवाड यांनी आंबी यांच्याशी चर्चा केली.. त्यानंतर खामगाव चौफुली वरील रणरणत्या उन्हात प्रकाश आंबी यांनी "शिवाजी कोण होता?" या पुस्तकाचे जाहीर वाचन केले..
चिखली
दरम्यान पुस्तकाचे वाचन करताना देखील प्रकाश आंबी यांनी जसा पुस्तकात छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख आहे तसाच उल्लेख केला. यावेळी खामगाव चौफुलीला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते, शंभरावर अधिक पोलिसांचा बंदोबस्त परिसरात लागलेला होता. दरम्यान वातावरण चिघळत असल्याचे पाहून प्रकाश आंबी आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेण्यात आले असून चिखली पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी नेण्यात आले आहे. 
चिखली
आतापर्यंत काय झाले?
१)बुलढाणातील मोर्चाला रोहित पवार येणार होते, त्यांचा दौरा रद्द..
२)मोर्चासाठी लावण्यात आलेले मंडप, खुर्च्या आमदार गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी काढून नेल्याचा आरोप कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने करण्यात आला..
३) प्रकाश आंबी यांनी छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केला तर कानफाटात वाजवू असा इशारा आमदार गायकवाड यांनी दिला..
४) बुलढाणा कडे जात असलेल्या प्रकाश आंबी यांना चिखली तस पोलिसांनी अडवले, हॉटेल अमृततुल्य मध्ये चर्चा..
५) बुलढाण्यात आंदोलन आक्रमक, संजय गायकवाड मुर्दाबादच्या घोषणा.. गायकवाड समर्थक ही एकवटले.. पोलिसांनी आंदोलकांना फरफटत नेले, आंदोलन दडपले..
६) चिखलीत आंबी यांचा बुलढाण्याला जाण्याचा आग्रह पोलिसांनी फेटाळला.. चिखलीतच आंबी यांनी खामगाव चौफुलीवर पुस्तकाचे वाचन केले..त्यातही छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख! 
७)पोलिसांनी प्रकाशक आंबी यांना उचलून चिखली पोलीस ठाण्यात नेले..