BIG NEWS उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाणा जिल्ह्यात! कसा आहे कार्यक्रम..वाचा मिनिट टू मिनिट प्रोग्राम

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज, २३ सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील विविध दुष्काळग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत.

असा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा..

उपमुख्यमंत्री शिंदे दुपारी १ वाजून १० मिनिटांनी खामगाव तालुक्यातील कलोरी येथे पोहोचून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करतील. त्यानंतर १ वाजून ३० मिनिटांनी बुलढाणा तालुक्यातील भादोला येथे पाहणी केली जाणार आहे. यानंतर मोताळा तालुक्याकडे रवाना होतील. दुपारी २ वाजता खडकी व खामखेड, २ वाजून २० मिनिटांनी रोहिणखेड, तर २ वाजून ४५ मिनिटांनी टाकळी येथे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर ३ वाजून १० मिनिटांनी तिघ्रा परिसरातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी उपमुख्यमंत्री शिंदे करणार आहेत.

दौऱ्याच्या शेवटी ३ वाजून २० मिनिटांनी खामगाव येथील सिद्धिविनायक टेक्निकल कॉलेज येथे ते पोहोचतील. येथून हेलिकॉप्टरने ते छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करणार आहेत.