मोठी बातमी! जिल्ह्यातील हजारो शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.! काय आहे विषय?

 
Buldhana
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर आज ,२५ सप्टेंबर रोजी शिक्षकांचा अतिविराट मोर्चा धडकला आहे. शिक्षकांच्या विविध मागण्या संदर्भात हा मोर्चा आहे.

कमी पटसंख्या असलेल्या सरकारी शाळांसाठी कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ३१ सप्टेंबर रोजी भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मात्र, शिक्षकांनी या संदर्भात तीव्र विरोध केला आहे. तसेच , विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन जिल्हाभरातील हजारो शिक्षक आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले आहेत.