मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज बुलडाण्यातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे उद्घाटन!

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा येथील शासकीय मेडिकल कॉलेजला केंद्र शासनाने नुकतीच मान्यता दिली. यंदाच या महाविद्यालयात १०० विद्यार्थ्यांचे प्रथम वर्षाला प्रवेश होणार आहेत. दरम्यान या महाविद्यालयाचे उद्घाटन आज,९ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महाविद्यालयाचे ऑनलाईन उद्घाटन करणार आहे. 
 दुपारी १ वाजता हा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल सी.पी. राधाकृष्ण, केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव देखील यांची देखील ऑनलाइन उपस्थिती राहणार आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय, क्षयरोग रुग्णालय परिसर धाड रोड बुलडाणा येथे हा कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.