BIG BREAKING विश्व पानसरे की निलेश तांबे ? वाचा काय ठरलं.....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्हा पोलीस दलात सध्या "एसपी" च्या खुर्चीवरून प्रश्न प्रलंबित आहे. विश्व पानसरे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी निलेश तांबे यांची नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्ती झाल्या नंतर त्याच दिवशी निलेश तांबे यांनी रात्रीच पदभार घेतला होता. त्याआधीच विश्व पानसरे आजारी रजेवर गेले होते..दरम्यान आठ महिन्यातच बदली झाल्याने अन्याय झाल्याची भावना होऊन विश्व पानसरे बदलीच्या निर्णयाविरोधात कॅट मध्ये गेले. कॅट ने बदली आदेशावर स्थगिती दिली... त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचे एसपी पानसरे की निलेश तांबे अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली होती..३० मे रोजी विश्व पानसरे यांनी सकाळीच एसपी कार्यालयात येऊन खुर्चीचा ताबा घेतला होता..त्यादिवशी दिवसभर त्याच बातमीची चर्चा होती.. दुपारी आयजी रामनाथ पोकळे यांनी मध्यस्थी करीत ९ जून च्या सुनावणी पर्यंत "जैसे थे " ठेवण्याच्या सूचना दिल्या..तेव्हापासून निलेश तांबे हेच कारभार सांभाळत आहेत..दरम्यान आज होणाऱ्या सुनावणीकडे जिल्हा पोलीस दलासह जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून होते...
  २२ मे रोजी विश्व पानसरे बदली झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी या बदलीला कॅट मध्ये आव्हान दिले होते. विश्व पानसरे यांच्या वतीने आर.जी. वालिया यांनी युक्तीवाद केला होता. विश्व पानसरे यांची बदली महाराष्ट्र पोलीस अधिनियम २२ एन नुसार केल्याचा उल्लेख बदली आदेशात होता. मात्र महाराष्ट्र पोलीस अधिनियम २२ एन नुसार २ वर्षांपेक्षा कमी कार्यकाळ असताना बदली करता येत नाही. पानसरे यांच्या बुलढाणा कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाली नव्हती, शिवाय बदली आदेशात बदलीच्या कारणाचा उल्लेख देखील नव्हता असे निरीक्षण नोंदवत कॅटने बदली आदेशाला स्थगिती देत ९ जून सुनावणीची तारीख ठरवली होती..
आज काय झाले?
आज संपूर्ण जिल्हा पोलीस दलासह नागरिकांचेही लक्ष एसपी कोण? कॅट चा निर्णय काय येतो याकडे लागून होते. बुलडाणा लाइव्ह ला मिळालेल्या माहितीनुसार सरकारच्या वतीने आज ॲड. डॉ. विनय मसुरकर आणि एस. एन. राजपुरोहित यांनी युक्तिवाद केला. पानसरे यांच्या वतीनेही आर. जी. वालिया यांनी बाजू मांडली. कॅट ने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून सध्या असलेली स्थगिती कायम ठेवत १२ जूनला अंतिम आदेशाची तारीख ठेवल्याची माहिती आहे...