Big Breaking! स्वातंत्र्य दिनापासून व्यापाराला मिळणार “स्वातंत्र्य’!! रात्री दहापर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास मुभा; विवाह सोहळे मुक्त; धार्मिक स्थळे, सिनेमागृह मात्र बंदच, सर्व कर्मचाऱ्यांसाठी दोन लसची अट बंधनकारक; परराज्यातील “त्या’ प्रवाशांनाच सवलत

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्य शासनाच्या पातळीवर दीर्घचिंतन झाल्यावर १५ आॅगस्टच्या मुहूर्तावर व्यापार उदिमाला संपूर्ण स्वातंत्र्य बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी बुलडाणा जिल्ह्यातील बहुतेक व्यापारी आस्थापना आता खऱ्या अर्थाने मुक्तपणे व्यवसाय करू शकतील. यामुळे यंदाचा स्वातंत्र्य दिन व्यापार जगतासाठी अविस्मरणीय राहणार आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील धार्मिकस्थळे व सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स …
 
Big Breaking! स्वातंत्र्य दिनापासून व्यापाराला मिळणार “स्वातंत्र्य’!! रात्री दहापर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास मुभा; विवाह सोहळे मुक्त; धार्मिक स्थळे, सिनेमागृह मात्र बंदच, सर्व कर्मचाऱ्यांसाठी दोन लसची अट बंधनकारक; परराज्यातील “त्या’ प्रवाशांनाच सवलत

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्य शासनाच्या पातळीवर दीर्घचिंतन झाल्यावर १५ आॅगस्टच्या मुहूर्तावर व्यापार उदिमाला संपूर्ण स्वातंत्र्य बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी बुलडाणा जिल्ह्यातील बहुतेक व्यापारी आस्थापना आता खऱ्या अर्थाने मुक्तपणे व्यवसाय करू शकतील. यामुळे यंदाचा स्वातंत्र्य दिन व्यापार जगतासाठी अविस्मरणीय राहणार आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील धार्मिकस्थळे व सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स यांचे टाळे तूर्तास तरी बंदच राहणार आहेत.

तमाम जिल्हावासियांसाठी मोठी आनंदाची व व्यापाऱ्यांना दिलासा देणारी ही गूड न्यूज जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिली आहे. आज १४ आॅगस्टला त्यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. मात्र सर्व व्यापारी आस्थापना अर्थात उपहारगृहे, दुकाने, शोरूम, जीम, सलून, शॉपिंग मॉल आणि बारमधील सर्व कर्मचाऱ्यांनी (अगदी सफाई कामगारांनी सुद्धा) दोन लस घेऊन १४ दिवस होणे बंधनकारक आहे. या अटीसह मास्कचा वापर करणारे कर्मचारीच काम करू शकतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. एसी असलेल्या बार व हॉटेलमधील किमान १ दरवाजा व २ खिडक्या उघड्या असणे आणि प्रसाधनगृहात उच्च दर्जाचा एक्झॉस्ट फॅन असणे ही अन्य अट आहे. या आस्थापना रात्री १० पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. मात्र पार्सल सेवा २४ तास देण्याची मोठी मोकळीक हॉटेल्सना देण्यात आली आहे. सलून, जिम, योगा केंद्रांना याच अटी लागू आहेत.

…आणि विवाह सोहळे!
दरम्यान, लाखोंच्या दृष्टीने लक्षवेधी ठरलेल्या विवाह सोहळ्यांना पण मोकळीक देण्यात आली असून, हॉटेलमध्ये ५० टक्के क्षमतेसह १०० तर मंगल कार्यालये, लॉन्समधील सोहळ्यात २०० जण हजेरी लावू शकतील. मात्र नियमांचे उल्लंघन केल्यास परवाना रद्दची कठोर कारवाई होणार आहे. इनडोअर स्टेडियममध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस आदी खेळांना मुभा राहील. परराज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या ज्या प्रवाशांनी दोन लस घेतल्या त्यांना आरटीपीसीआर टेस्टचे बंधन नसणार आहे. मात्र असे नसेल तर त्यांना ही टेस्ट करवून १४ दिवस होम क्‍वारंटाइन राहणे बंधनकारक राहील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.