पेंनटाकळी नदीकाठच्या नागरिकांनो सावधान! धरणाचे सर्वच दरवाजे उघडले...

 
 मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील पेंनटाकळी प्रकल्पातून वाढत्या पाणलोटामुळे धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. १८ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजल्यापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पात प्रचंड पाण्याची आवक वाढली. त्यानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पेंनटाकळी प्रकल्पाचे सर्व ९ दरवाजे तब्बल ५० सें. मी. ने उघडले आहेत.
दरवाजे उघडल्याने नदीकाठच्या गावांमध्ये २००६ सालची आपत्तीजन्य परिस्थिती पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांना तसेच ग्रामस्थांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
तालुका प्रशासनाने सर्व शाळा, महाविद्यालये व शासकीय कार्यालयांना खबरदारीचा इशारा दिला असून, आवश्यक नसल्यास कोणीही बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नदीकाठच्या गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी सुरक्षित स्थळी राहावे, धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे प्रशासनाने कडक इशारा दिला आहे