अतिवृष्टीच्या सर्वेक्षणात घाेळ, अपात्र लाभार्थ्यांना लाभ; पात्र शेतकऱ्यांना डावलले; बिबी परिसरातील शेतकऱ्यांचा आराेप; दाेषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी!

 
 बीबी (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :लाेणार तालुक्यातील बिबी परिसरात अतिवृष्टीने माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानाचे ग्राम मंडळ अधिकारी, कृषी सहायकांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले. मात्र, बिबी शिवाराचे ग्राम अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसून सर्वेक्षण व पंचनामे केले. अपात्र लाभार्थ्यांना लाभ दिला व पात्र लाभार्थ्यांना लाभपासून डावलल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची चाैकशी करून दाेषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

बिबी येथे झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे तलाठी व कृषी सहाय्यकांनी चुकीचे केल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे.त्यामुळे तलाठी व कृषी सहाय्यकांनी पंचनामे हे धाब्यावर बसूनच केलेले आहे की काय अशी शंका येत आहे. अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यादीतून वगळले आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.