सावध व्हा, सावध व्हा! जिल्हा प्रशासनाकडून येलो अलर्ट जारी! गरज पडल्यास जिल्हा यंत्रनेशी साधा संपर्क..
Aug 19, 2025, 12:39 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) भारतीय हवामान विभागाने बुलढाणा जिल्ह्यासाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे आणि मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
खडकपूर्णा व पेनटाकळी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या जोरामुळे धरणांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळते. आवश्यकतेनुसार दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. परिणामी, खडकपूर्णा व पेनटाकळी नद्यांची पातळी वाढल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने बुलढाणा जिल्ह्यासाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचे तसेच आपत्ती परिस्थितीत तातडीने संबंधित नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हा पोलिस नियंत्रण कक्ष, बुलढाणा
दूरध्वनी : ०७२६२-२४२४००, मोबाइल : ९४२२८८०११३
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, बुलढाणा
दूरध्वनी :०७२६२-२४२६८३, टोल फ्री :१०७७, मोबाईल : ७०२०४३५९५४