तळीरामांसाठी 'बॅड न्यूज', ३१ मार्चला 'ड्राय डे'!
Mar 29, 2025, 08:02 IST
बुलढाणा: जिल्ह्यात सोमवार ३१ मार्च २०२५ रोजी किंवा चंद्र दर्शनानुसार एक दिवस पुढे-मागे रमजान ईदचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे.
या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी आणि सार्वजनिक शांततेस बाधा येऊ नये याची प्रशासन दक्षता घेत आहे. यासाठी दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम १४२ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून ३१ मार्च "कोरडा दिवस" म्हणून जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी याचे आदेश निर्गमित केले आहे.
या आदेशा नुसार बुलढाणा जिल्ह्यातील सर्व देशी-विदेशी दारू दुकाने, परवानाकक्ष, तसेच बिअर बार संपूर्ण दिवस बंद राहणार आहेत. सर्व अनुज्ञप्तीधारकांनी हे आदेश पाळणे बंधनकारक आहे .या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा ईशारा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशाद्वारे दिला आहे.