Bad News : उद्यापर्यंत पुरेल एवढाच जिल्ह्यात ऑक्सिजन साठा!; Good News : प्रशासनाच्‍या गतिमान हालचालींमुळे रोज 8 मेट्रिक टन ऑक्सिजन येण्याची शक्‍यता!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याला येत्या काही दिवसांतच ऑक्सिजनचा नियमित पुरवठा करण्यात येणार आहे. परिणामी जिल्ह्याला रोज कमीअधिक 8 मेट्रिक टन इतका ऑक्सिजन मिळणार आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेची मोठी डोकेदुखी व रुग्ण, त्यांच्यासोबतच्या नातेवाइकांची मोठी अडचण दूर होणार असतानाच रुग्णांचे प्राण वाचणार आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप झाला असून, रोज 800 ते …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याला येत्या काही दिवसांतच ऑक्सिजनचा नियमित पुरवठा करण्यात येणार आहे. परिणामी जिल्ह्याला रोज कमीअधिक 8 मेट्रिक टन इतका ऑक्सिजन मिळणार  आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेची मोठी डोकेदुखी व रुग्ण, त्यांच्यासोबतच्या नातेवाइकांची मोठी अडचण दूर होणार असतानाच रुग्णांचे प्राण वाचणार आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप झाला असून, रोज 800 ते 1100 दरम्यान पॉझिटिव्ह येत आहेत. यातील शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झालेल्या वा गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची सक्त आवश्यकता असते. मात्र शासकीय रुग्णालयांप्रमाणेच खासगीमध्येही ऑक्सिजनचा तुटवडा असतो.  मागणी व आवश्यकतेच्या तुलनेत पुरवठा होत नाही. अगदी आजही जिल्ह्यात उद्या शनिवारपर्यंत पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणांनी शासनाकडे आवश्यक ऑक्सिजनची मागणी सादर केली. दरम्यान आज, 23 एप्रिलला ही समस्या दूर झाली. आज झालेल्या व्हिडिओ कॉन्‍फरन्सिंगमध्ये वरिष्ठांनी जिल्ह्याला दररोज ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येईल, असे सांगितले, यामुळे उद्या परवापासून जिल्ह्याला रोज किमान 8 मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा होणार आहे. यामुळे मोठी अडचण दूर होणार आहे. यासंदर्भात विचारणा केली असता प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे यांनी याला दुजोरा दिला.

‘ओजीपी’मधून लवकरच निर्मिती

दरम्यान, जिल्ह्यातील 5 ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांट कार्यान्वित होणार आहेत. केंद्र शासनाकडून प्राप्त ही संयंत्रे बुलडाणा, मलकापूर, खामगाव, देऊळगावराजा व शेगाव येथे बसविण्यात आली आहे, ती कार्यान्वित झाल्यावर त्यातून रोज 80 जम्बो सिलिंडर इतका ऑक्सिजन उपलब्ध होणार असल्याचे उप जिल्हाधिकारी अहिरे यांनी स्पष्ट केले.