सावकाराच्या घरी सहाय्यक निबंधकांची धाड! घरात सापडले सही केलेले ६१ कोरे चेक!
Jul 18, 2025, 09:52 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :तालुक्यातील जयपूर येथील संदीप विनायकराव देशमुख यांच्या घरी मोताळा सहाय्यक निबंधक जी. जे. आमले यांच्या पथकाने धाड टाकली. या धाडीत पथकाने कोरे बॉण्ड, विविध प्रकारचे विविध बँकेचे विविध व्यक्तीचे ६१ प्रकारचे स्वाक्षरी केलेले कोरे धनादेश व ५ मोबाईल जप्त करण्यात आले.
जी.जे. आमले सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मोताळा यांच्या पथकाने काल गुरुवार १७ जुलै रोजी अवैध सावकारी व्यवहारातंर्गत जिल्हा निंबधक सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था बुलढाणा यांच्याकडे दाखल तक्रारीच्या अनुषंगाने जयपूर येथील संदीप विनायकराव देशमुख यांच्या घरी धाड टाकून झडतीची कारवाई केली. घरातील झाडाझडतीत कोरे बॉण्ड तसेच सबळ पुराव्यासह तक्रार प्राप्त झाल्यास अवैध सावकारांवर महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार चौकशी करुन अवैध सावकारी सिध्द झाल्यास फौजदारी कारवाई करण्यात येते. अवैध सावकारीबाबत तक्रारी असल्यास शेतकऱ्यांनी जिल्हा निबंधक(सावकारी) बुलढाणा कार्यालयाशी संपर्क साधावा असे आव्हान जी.जे आमले यांनी केले आहे.