नगराध्यक्षपदाच्या 42 तर सदस्यपदाच्या 414 उमेदवारांनी घेतली माघार; जिल्ह्यातील 11 नगर पालिकांमधील लढतीचे चित्र स्पष्ट; एकूण 456 उमेदवारांची माघार !
Nov 21, 2025, 21:10 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्हयातील 11 नगर पालिकांच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाच्या 42 तर सदस्यपदाच्या 414 उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतली आहे.तीन दिवसात जिल्ह्रयात एकूण 456 उमेदवारांनी माघार घेतली आहे.
जिल्ह्यात 11 नगर पालिकांची निवडणुकीतील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. 11 नगर पालिकांसाठी मोठया प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने अपक्ष आणि बंडखोर उमेदावरांनी माघार घ्यावी यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती.अखेर तीन दिवसात जिल्ह्यात नगराध्यक्ष पदाच्या 42 तर सदस्यपदाच्या 414 उमेदवारांनी माघार घेतली आहे.आता निवडणुक रिंगणातील चित्र स्पष्ट झाले असून प्रचारास प्रारंभ झाला आहे.
नगर पालिका निहाय घेतलेली माघार
नगर पालिका अध्यक्ष सदस्य
बुलढाणा १ ३३
चिखली. ८ ४६
देऊळगाव राजा ९ ४५
जळगाव जामोद ५ १८
खामगाव २ २७
लोणार ८ ४१
मलकापूर २ ६६
मेहकर ० ४५
नांदुरा १ ४५
शेगाव ४ ३५
सिंदखेड राजा २ १३
